बालाघाट पॉलिटेक्निक चे नेत्रदीपक यश
बालाघाट पॉलिटेक्निक चे नेत्रदीपक यश
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील रुद्धा येथील बालाघाट पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने हिवाळी परीक्षा २०२४ च्या परीक्षेचा निकाल दि २७ जानेवारी रोजी जाहीर झाला असून यामध्ये बालाघाट तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
कम्प्युटर विभागातून तृतीय वर्षांमध्ये प्रथम शिंदे सुमित बालाजी ९०.३३ %, द्वितीय आवाळे साक्षी ईश्वर ८७.३३ %, तृतीय तांबोळकर श्रीगुरु रविनाथ ८६.४४ % , द्वितीय वर्षामध्ये प्रथम कांबळे रोहिणी राजेश ८४.३५ %, द्वितीय बडे आर्यन दत्तात्रेय ८०.४७ %, तृतीय उपरवाड प्रगती संजय ७७.७७ %, प्रथम वर्षामध्ये प्रथम राठोड साक्षी राजपाल ८३.७७ % प्रथम देशमुख वैभव भाऊराव ८३.७७ %, द्वितीय वळसणे ऐश्वर्या निवृत्ती ८३.४१ %, तृतीय माने प्रतीक्षा दयानंद ८०.९४ %.
सिव्हिल विभागातून तृतीय वर्षांमध्ये प्रथम पांढरे प्रेरणा बालाजी ७९.९० %, दुतीय शिंदे उमेश रमेश ७७.२० %, तृतीय शेरे अथर्व नागनाथ ७५.४०%, द्वितीय वर्षांमध्ये प्रथम शेट्टी अक्षय दिलीप ८१.६५%, द्वितीय नागेश पुंडलिक ७८.००%, तृतीय लांडगे सोमनाथ सिद्राम ७५.००%, प्रथम वर्षामध्ये प्रथम पृथ्वी महामारे ८०.१२%, द्वितीय सिद्धकी नोमान रियाज अहमद ७७.६५ %, तृतीय मांजरमकर सचिन दीपक ७७.०० %.
इलेक्ट्रिकल विभागामध्ये तृतीय वर्षामध्ये प्रथम पुंड अथर्व आनंद ८०.००%, द्वितीय शेख निषाद सलीम ७८.०० %, तृतीय भिसे संकेत शिवाजी ७७.३० %, द्वितीय वर्षांमध्ये शैलेश शिवराज बरुळे ८०.०० %, द्वितीय सय्यद महबूब नसीर ७५.००%, तृतीय खडके शिवकांत महेश्वर अप्पा ७३.००%, प्रथम वर्षामध्ये नाथ जोगी सिद्धांत बद्रीनाथ ७८.००%, द्वितीय सूर्यवंशी प्रदीप तुकाराम ७७.८३ %, सोनकांबळे रितेश उत्तम ७७.४१ %.
मेकॅनिकल विभागातून द्वितीय वर्षांमध्ये प्रथम सांगळे गजानन रमेश ७१.०० %, द्वितीय वाघमारे वैभव विलास ७०.३३%, तृतीय शिंदे पवन रमाकांत ६९.४४ %, प्रथम वर्षामध्ये प्रथम गवळे सौरभ शंकर ७६.७१%, द्वितीय रायभोळे अविनाश माधव ७३.२९ %, तृतीय देवकते सुरज ७१.६५ %, गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.
या यशाबद्दल संस्था अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन केले. तसेच संस्था सचिव रेखाताई तरडे, संचालक अमरदीप हाके, प्राचार्य संग्राम कोपनर, मदन आरदवाड सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व इतर कर्मचारी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
