संत ज्ञानेश्वर विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
संत ज्ञानेश्वर विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरासंत ज्ञानेश्वर विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण सोहळा संस्थेच्या सचिव प्राचार्या रेखाताई हाके-तरडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर शिक्षक पालक संघाचे नवनाथ हांडे, एकनाथ ढोकाडे, सादिक शेख,अशपाक पठाण, शामसुंदर गंगथडे, मुख्याध्यापक आशा रोडगे, माध्यमिक मुख्याध्यापक मीना तोवर सह मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विविध गुणदर्शनाचा सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अनुभवामृत या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण,भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा व एलिमेंटरी, इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मान्यवरांची मनोगतपर भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशा रोडगे यांनी केले.सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले तर आभार सविता करंडे यांनी मांनले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
