अहमदपूरात शासकीय ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात साजरा

0
अहमदपूरात शासकीय ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात साजरा

अहमदपूरात शासकीय ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा सार्वजनिक सोहळा उपजिल्हाधिकारी मंजुषाताई लटपटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून विविध शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने समारोप करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर तहसीलदार उज्वलाताई पांगरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे, पोलीस निरीक्षक वीरप्पा भुसनूर, तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
ध्वजारोहण झाल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने उपस्थित मान्यवरांना मानवंदना करून संविधानाचे वाचन मंजुषा लटपटे यांनी करून प्रशासनाच्या वतीने सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
यावेळी वीर पत्नी मालती दिलीप केंद्रे व कॅप्टन माधव शिरसाट यांचा प्रशासनाच्या वतीने संविधाना चे पुस्तक, पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी वाकी नदीत पडलेल्या महिलेला प्राणाची बाजी लावून वाचवणाऱ्या विजय तत्तापुरे यांचा, विधानसभा निवडणूक 2024 यामध्ये उल्लेखनीय उल्लेखनीय काम करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांचा, स्विपच्या सदस्यांचा, जागो ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात विशेष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन राम तत्तापुरे यांनी तर आभार नायब तहसीलदार शुभांगी जवादे यांनी मांनले.
या सांस्कृतिक सोहळ्यामध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद मुलांची शाळा, निवासी अपंग विद्यालय, नूतन मराठी विद्यालय, यशवंत प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, रवींद्रनाथ टागोर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, हरिवंशराय बच्चन विद्यालय, विमलाबाई देशमुख प्राथमिक माध्यमिक कन्या शाळा, नूतन प्राथमिक माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य,अभिनय सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.
या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवानंद हेंगणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, माजी नगराध्यक्ष सरस्वतीताई कांबळे, प्रा. डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, नायब तहसीलदार सर्वश्री संतोष अनारथे, अभिलाष जगताप, मुनवर मुजावर, संजय भोशीकर, श्रीमती शुभांगी जवादे, केंद्रप्रमुख नंदकुमार कोणाले यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण प्रेमी नागरिक आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि महसूल कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!