जिल्हा युवा पुरस्काराने ॲड. दीपाली अभिजीत औटे सन्मानीत
उदगीर (एल.पी.उगीले) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे च्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी लातूरच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा जिल्हा युवा पुरस्कार उदगीर येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या लातूर जिल्हा कार्याध्यक्षा ॲड. दीपाली औटे यांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे लातूर जिल्हाचे पालक मंत्री ना. शिवेंद्रसिंह राजे भोसले व लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे व जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . ॲड.दीपाली औटे यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील , महाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा उदगीर चे आमदार संजय बनसोडे , शिक्षक आमदार विक्रम काळे, राकाँपाचे प्रदेश सरचिटणीस अँड व्यंकट बेद्रे यांनी अभिनंदन केले आहे . या वेळी माजी नगरसेवक राजकुमार चव्हाण, राकॉपा अल्पसंख्यक विभगाचे जिल्हाध्यक्ष शफी हाशमी, राकॉपा सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जोंधळे व राकाँपा सांस्कृतिक विभागाचे लातूर जिल्हाध्यक्ष अभिजीत औटे आदी उपस्थित होते.