ग्रामीण भागात शेळीपालनातून आर्थिक उन्नती सहज शक्य – प्रा.डॉ. नंदकुमार गायकवाड

0
ग्रामीण भागात शेळीपालनातून आर्थिक उन्नती सहज शक्य - प्रा.डॉ. नंदकुमार गायकवाड

ग्रामीण भागात शेळीपालनातून आर्थिक उन्नती सहज शक्य - प्रा.डॉ. नंदकुमार गायकवाड

उदगीर (एल.पी.उगीले) : शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी पशुपालनाने आपली उपयोगीता सिद्ध केलेली आहे. ग्रामीण भागात शेळीपालन व्यवसायातून कुटुंबाची आर्थिक उन्नती सहज शक्य असल्याचे प्रतिपादन पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीरचे अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांनी केले. ते माफसू, नागपूर व महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांच्या दरम्यान झालेल्या सामंजस्य करारानुसार ‘महाराष्ट्रातील शेळी व कुक्कुटपालन करणा-या महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी पशुसखी व प्रशिक्षक महिलांचा क्षमता विकास’ या प्रकल्पाअंतर्गत दि.२७ ते ३१ जानेवारी २०२५ दरम्यान पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर येथे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील पशुसखींसाठी ‘शेळीपालन’ या विषयावर आयोजित पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मन्सूर पटेल, जिल्हा समन्वय अधिकारी, माविम, लातूर, सौ. शोभा कुलकर्णी, जिल्हा समन्वय अधिकारी, माविम, धाराशिव, प्रशिक्षण समन्वयक डॉ. शरद आव्हाड, प्रशिक्षण सह-समन्वयक डॉ. मत्स्यगंधा पाटील व डॉ.राहुल सुर्यवंशी उपस्थित होते. डॉ. गायकवाड यांनी पशुसखींना मार्गदर्शन करतांना प्रशिक्षण खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी पशुसखींचा सहयोग आणि समर्पन आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. मन्सूर पटेल, जिल्हा समन्वय अधिकारी, माविम, लातूर आणि सौ. शोभा कुलकर्णी जिल्हा समन्वय अधिकारी, माविम, धाराशिव यांनी याप्रसंगी पशुसखींना पशुसखींचे पशुसंवर्धनातील योगदान आणि अपेक्षित भूमिका यावर समयोचित मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण समन्वयक डॉ. शरद आव्हाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपस्थित पशुसखींना प्रशिक्षणाबाबत अवगत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. वेदांत पांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशिक्षण डॉ. संकेत नरवाडे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रकल्प सह-समन्वयक डॉ. नरेन्द्र खोडे, प्रशिक्षण सह-समन्वयक डॉ. मत्स्यगंधा पाटील, डॉ.राम कुलकर्णी, डॉ.राहुल सुर्यवंशी व पदव्युत्तर विद्यार्थी डॉ.अय्यान पाटील, डॉ. सुहासिनी हजारे यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी इतर प्राध्यापक वृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *