आर्य वैश्य महासभा हळदी कुंकू स्नेहमिलन
उदगीर (एल.पी.उगीले) : आर्य वैश्य महाराष्ट्र महासभा आयोजित उदगीर शहरात मकर संक्राती निमित्त हळदीकुंकू निमित्त स्त्रियांचे स्नेहमिलन झाले. उदगीर चौबारा येथील नगरेश्वर मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
प्रयागराज येथे संपन्न होत असलेल्या “महाकुंभ उत्सव“ या देखाव्याचे तसेच “तिरुपती व्यंकटेश “ या देखाव्याचे आयोजन केले होते.
“हळदी कुंकू “,तिळगूळ ,संक्रांतीचे वाण ,यांची देवाणघेवाण करीत उदगीर येथील सर्व स्त्रियाचे स्नेहमिलन पारंपरिक पद्धतीने अत्यंत जोरदार झाले .
सर्व जाती,पंथ ,धर्म ,वर्ण या विषमतेचे बंध संपवून मानवजातीच्या एकाच धर्माच्या आदर्श तत्वावर आधारित हे हळदीकुंकू तब्बल चार ते साडेचार हजार स्त्रियासह संपन्न झाले. हिवाळ्यात पौष्टिक म्हणून राजगिरा लाडूचे वाण महिलांना वाटप करण्यात आले .
सर्वेश ट्रेडर्स श्री श्याम मलगे यांनी दिड हजार “घरगुती उपयोगी साबण “देवून सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला .
सामाजिक ,अध्यात्मिक वारसा जपत अत्यंत निष्ठेने ,आनंदाने हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला .
आर्य वैश्य महासभेच्या अध्यक्षा सुजाताताई किशोर पंदिलवार
तसेच सर्व कार्यकारिणी आणि सदस्या यांच्यामार्फत संपन्न झालेले हे हळदीकुंकू स्नेहाचा एकात्मतेचा संदेश देणारे ठरले.