एसटीच्या दरवाढी विरोधात ठाकरे शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन

0
एसटीच्या दरवाढी विरोधात ठाकरे शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन

एसटीच्या दरवाढी विरोधात ठाकरे शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या गोरगरीबांची जीवनवाहिनी असलेल्या एसटी बसच्या तिकीट दरात एकाचवेळी १५ टक्के दरवाढ करण्याचा जाचक निर्णय सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, नागरिकांसाठी अत्यंत जाचक आहे. राज्य सरकारने राज्यातील जनतेवर लादलेला हा निर्णय तातडीने रद्द करावा. अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी केली.
एसटीच्या तिकीटाची भाडेवाढ राज्यात आजपासून लागू झाली आहे. त्यामुळे शहरातील आणि खेडोपाड्यातील सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याची दखल घेत ठाकरे शिवसेनेच्या वतीने लातूर येथे जुना रेणापूर नाका मध्यवर्ती बस स्थानकासमोरील गेटवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी विभागीय नियंत्रक यांच्यामार्फत शासनाकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, सहसंपर्कप्रमुख नामदेव चाळक, उपजिल्हाप्रमुख बालाजी जाधव, महानगर प्रमुख सुनील बसपुरे, युवा सेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, शहरप्रमुख विष्णूपंत साठे,रेणापूर तालुकाप्रमुख परमेश्वर सुर्यवंशी, त्र्यंबक स्वामी, रमेश मामा माळी, अजित सोमवंशी, बस्वराज मंगरुळे, राजाभाऊ घरटमल, विष्णू कांबळे, राजु कतारे, रफीक नाना, राहुल रोडे, खंडु जगताप, दिलिप भालेकर, समद शेख, दत्तु मोरे, प्रशांत मठ्ठ, करण शिंदे, महेश गायकवाड आदी सह शिवसैनिक उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *