उदगीर रोटरीच्या वतीने एस. टी. कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
उदगीर रोटरीच्या वतीने एस. टी. कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
उदगीर (एल.पी.उगीले) : रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उदगीरच्या एस. टी. आगारातील कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
दोन दिवसीय आयोजित या आरोग्य शिबिराचे उद्घाटन आरटीओ इन्स्पेक्टर शांताराम साठे यांच्या हस्ते करण्यात आले. तर तहसीलदार राम बोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचा समारोप करण्यात आला.
यावेळी आगार प्रमुख चिन्मय चिटणीस, सहाय्यक परिवहन निरीक्षक राजकुमार नरेशगुंडे, उदगीर आगारातील कार्यशाळा प्रमुख पृथ्वीराज कोकाटे, रोटरीच्या अध्यक्षा सरस्वती चौधरी, उपाध्यक्ष रविंद्र हसरगुंडे, सचिव ज्योती चौधरी, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. मोहन वाघमारे आदींची उपस्थिती होती. या शिबिरात उदगीर एस. टी. आगारातील वाहक, चालक व अन्य सर्व कर्मचाऱ्यांची दंतरोग, नेत्ररोग व मधुमेह तपासणी करण्यात आली. या शिबिरात डॉ. योगेश बिरादार यांनी हृदयरोगा संदर्भात मार्गदर्शन करीत असताना आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास घ्यावयाची काळजी, याबाबत प्रत्यक्षिकेसह मार्गदर्शन केले. या शिबिरात उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे डॉ. माधव मधुकर यांनी नेत्रतपासणी तर डॉ. मोहन वाघमारे यांनी दंत तपासणी केली. पुरी लॅबोरेटरीचे प्रवीण पुरी यांनी मधुमेह तपासणी केली.
या शिबिरास डॉ. बस्वराज स्वामी, डॉ. संतोष पांचाळ, कृष्णा जाधव, सतिष पाटील, संतोष फुलारी, विजयकुमार पारसेवार, व्ही.एस. कणसे, अँड. मंगेश साबणे, प्रशांत मांगुळकर, नागेश आंबेगावे, विक्रम हलकीकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल जैन यांनी केले. सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन विशाल तोंडचीरकर यांनी केले.
