भाजपा मोठा भाऊ असेल तर महायुती राहील नाहीतर भाजपा स्वबळावर लढणार – राहुल केंद्रे
भाजपा मोठा भाऊ असेल तर महायुती राहील नाहीतर भाजपा स्वबळावर लढणार - राहुल केंद्रे
उदगीर (एल.पी.उगीले) : आगामी काळात होणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप हा मोठा भाऊ असेल तरच महायुती राहील. अन्यथा भारतीय जनता पार्टी निवडणुका स्वबळावर लढणार. असा ईशारा लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे युवा नेते राहुल केंद्रे यांनी बनशेळकी या ठिकाणी भारतीय युवा मोर्च्याच्या वतीने आयोजित सदस्य नोंदणी व भारत मातेचे पूजन या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गुरनाथ बिरादार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा युवा मोर्चेचे जिल्हा अध्यक्ष अमोल निडवदे, भाजयुमो जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रसाद नाईकवाडे, सोसायटी चे चेअरमन प्रल्हाद महाजन, उपसरपंच विवेक महाजन, भाजयुमो उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरच्या हस्ते भारत मातेच पूजन करण्यात आले.
पुढे बोलताना राहुल केंद्रे म्हणाले कि, भारतीय जनता पार्टीत ही निष्ठावंत कार्यकर्ते बेस असलेला पक्ष असून सर्व सामान्य कार्यकर्त्यांना पक्षात मोठा सन्मान मिळतो.येणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीत युवकांना संधी मिळणार असुन युवकानी मोठया प्रमाणात सदस्य नोंदणी करावे. असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केले.
या वेळी उमाकांत श्रीडोळे, अमोल निडवदे यांनीही आपले विचार व्यक्त केले.सदरील या कार्यक्रमाचे आयोजन भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष महादेव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संकेत बिरादार,तालुका उपाध्यक्ष उमाकांत लोहारे यांनी केले होते. या कार्यक्रमाला लक्षमण हाडोळे,अनिल आंबेगावे, महादेव बिरादार, महिला कार्यकर्ता सत्यभामा आंबेगावे,
राहुल मेहत्रे,किशन मचकूरी, ओमकार बिरादार,अंबादास चिखलचादे,मनोज गवरे, अमोल आवाळे, भगवान हरभरे, बाबुराव बिरादार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार भाजपा ओबीसी मोर्चेचे युवा जिल्हा अध्यक्ष शुभम पांचाळ यांनी मांडले.
