साहित्यातील विनोद समाजासाठी दिशा दर्शक – मिर्झा रफी अहमद बेग
साहित्यातील विनोद समाजासाठी दिशा दर्शक - मिर्झा रफी अहमद बेग
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग, सुप्रसिद्ध हास्य कवी अमरावती म्हणाले, साहित्यातील विनोद समाजासाठी दिशा दर्शक असतात. या समारंभाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव अॅड.एस.टी.पाटील हे होते. मंचावर सचिव रामचंद्र तिरुके, सदस्य प्रा. मनोहर पटवारी, बसवराज पाटील मलकापूरकर, प्रशांत पेन्सलवार, शिवराज वल्लापुरे, मन्मथ बिरादार, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. जी. पाटील, एस. जी. कोडचे, पर्यवेक्षक एस. व्ही. मुडपे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रभारी डॉ. एस. एन. लांडगे, विद्यापीठ प्रतिनिधी सुप्रिया जगताप, विजयकुमार पाटील, माजी विद्यार्थी तथा माजी शिक्षक वैजनाथ पंचगल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थी प्रतिनिधींनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मस्के यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय प्रा. पी. पी. जाहुरे यांनी केला. यावेळी सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विद्यापीठ स्तरावर खेळांमध्ये यश मिळवणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यापीठ प्रतिनिधी जगताप हिने आपल्या मनोगतात महाविद्यालयातील जीवनाचे अनुभव सांगितले. डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांनी आपल्या विनोदी शैलीतून विद्यार्थ्यांसमोर साहित्यातील अनेक कवितांचा आणि अनुभवांचा खजिना सादर केला, ज्याने उपस्थित विद्यार्थ्यांचे मनोरंजन आणि प्रबोधन केले. अध्यक्षीय समारोपात अॅड.पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या अभिजात कलागुणांना संमेलन काळात बहर येतो, त्यांच्या कला भविष्यात नवा कलाकार घडवत असतात. सूत्रसंचालन प्रा. डॉ. ए. पी. मोरे यांनी तर आभार प्रा. डॉ. एम.बी. स्वामी यांनी मानले.
