शिवाजी महाविद्यालयातील येडतकर यांना राष्ट्रीय परिषदेतील संशोधनात प्रथम क्रमांक
शिवाजी महाविद्यालयातील येडतकर यांना राष्ट्रीय परिषदेतील संशोधनात प्रथम क्रमांक
उदगीर (एल.पी.उगीले) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आदर्श महाविद्यालय हिंगोली येथील दुग्धशास्त्र विभागाच्या वतीने एकदिवसीय राष्ट्रीय परिषद घेण्यात आली होती. या राष्ट्रीय परिषदेत शिवाजी महाविद्यालय उदगीर येथील दुग्धशास्त्र विभाग प्रमुख प्रा.रंजन येडतकर यांनी “पारंपरिक दुग्ध पदार्थांचे पृथकरण” आचार्य पदवीचे संशोधनाचे पोस्टर या मार्फत सादरीकरण केले. परिषदेत एकूण २५ च्या वर महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठासह इतर संस्थांचे संशोधनाचे सादरीकरण झाले. प्रा.आर.बी.येडतकर यांनी महाराष्ट्र राज्यातील २२ जिल्ह्यातून काही पारंपरिक दुग्ध पदार्थांचे पृथकरण केले. डॉ निरस, डॉ. चंद्रप्रकाश खेडकर व डॉ श्रीकांत कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर संशोधन केले. उत्कृष्ट संशोधन केल्या मुळे त्यांना राष्ट्रीय परिषदेत प्रथम पारितोषिक मिळाले. त्याबद्दल त्यांचा सत्कार, सन्मान जबलपूर येथील सिनिअर सायंटिस्ट डॉ.आर.एस.ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल महाविद्यालया च्या वतीने प्राचार्य डॉ.आर एम मांजरे व उपस्थित सर्व प्राध्यापक सहकाऱ्यांनी सत्कार करून त्यांचे कौतुक केले. त्यांच्या कार्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील, सचिव पी.टी.शिंदे व संस्थेच्या सर्व कार्यकारिणीने त्याचे अभिनंदन केले.
