‘कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे शिवनखेड (खुर्द) येथे मोफत आरोग्य शिबिर

0
'कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे शिवनखेड (खुर्द) येथे मोफत आरोग्य शिबिर

'कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे शिवनखेड (खुर्द) येथे मोफत आरोग्य शिबिर

उदगीर (एल.पी.उगीले) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्नित कृषी महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा, कृषी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे मोजे शिवनखेड खुर्द येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून मोफत औषधोपचार करण्यात आले. या शिबिरामध्ये महिला व पुरुष अबाल व वृद्धांनी सक्रिय सहभाग नोंदवून आरोग्य तपासणी करून घेतली. यामध्ये रक्त व रक्तदाब,मधुमेह,सांधेदुखी,संधिवात, अस्थिरोग, स्त्री रोग,मुख व दंत तपासण्या आणि इतर सर्वसामान्य आरोग्य तपासण्या करून रुग्णांना मोफत औषध गोळ्यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर दुर्धर आजाराच्या रुग्णांनी विशेष तज्ञ डॉक्टरांकडून तपासण्या करून औषधोपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. या शिबिराचा 120 हून अधिक अधिक नागरिकांनी फायदा घेतला. सदरील शिबिर यशस्वी आयोजना साठी डॉ. विजय बिरादार (अस्थिरोग तज्ञ), डॉ.राधिका बी बिराजदार (स्त्री रोग तज्ञ), डॉ. हर्षवर्धन विजय जाधव (जनरल मेडिसिन), डॉ.राम पाटील (पॅथॉलॉजी), डॉ.शीतल पाटील (दंतचिकित्सक) या तज्ञ डॉक्टरांच्या वतीने सक्रिय योगदान देण्यात आले. या आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, प्राचार्य डॉ.ए पी सूर्यवंशी,उपप्राचार्य डॉ.ए एम पाटील,कार्यक्रम अधिकारी डॉ.एस बी पवार,जनसंपर्क अधिकारी डॉ.आनंद दापकेकर,कार्यक्रम समन्वयक प्रा.पी. एल.सोळंके, प्रा.आशा अडलिंगे, प्रा. सुरेश नवले, डॉ.व्ही एम शिंदे, प्रा.एस टी डफडे, डॉ.दिपाली कोकाटे आदींनी परिश्रम घेतले. तसेच सरपंच सौ.शेख रुकसानाबी करीमसाब शेख,उपसरपंच सौ.शोभाताई बालाजी भंडारे, श्री.करीमसाब शेख, ज्ञानेश्वर शिंदे, श्री.अमोल सुवर्णकार,श्री वाघमारे (ग्रामपंचायत सेवक)आणि समस्त ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!