पतंजलि योग समितीच्या महिला आघाडीच्या वतीने हळदीकुंकूचा कार्यक्रम संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महिला पतंजली योग समिती व आर्य महिला मंडळ उदगीर तर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. बृहद् यज्ञ करुन हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मानवतेचा संदेश देणाऱ्या महर्षी दयानंद सरस्वतींच्या सुविचारचा संग्रह असलेला ग्रंथ महिलांना भेट स्वरूप देण्यात आला. तसेच योगाचे महत्त्व सांगून पतंजलीचे बिस्किटपुडे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचा लाभ जवळपास ६०० भगिनींनी घेतला. कार्यक्रम यशस्वीते साठी मीनाक्षी स्वामी, मधुमती शिंदे, रजनी अंबरखाने, संध्या बेद्रे, जयश्री धनश्री, राजश्री वलांडीकर, प्रियंका अंबेसंगे, कुमुद अंबेसंगे, तारामती नागठाणे, सुनीता पंडित, गौरी नागुरे, सुमनदेवी चव्हाण, लक्ष्मी बावगे, भगवती टवानी आदींनी परिश्रम घेतले.