क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0
क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे प्रजासत्ताक दिन आनंदाने साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून शाळेचे पालक तसेच माजी नॅशनल खेळाडू सचिन पडीले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष जीवनकुमार मद्देवाड, प्रमुख पाहुणे म्हणून PTA जॉइंट सेक्रेटरी शिवानी शेटे, सदस्य डॉ रामदास होळकर शाळेच्या प्राचार्या जेबाबेरला नादार, शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे, यांची उपस्थिती लाभली. सर्व शिक्षक वृंद, शाळेचे विद्यार्थी, पालकही उपस्थित होते.

मुख्य अतिथी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थी बँड ग्रुपच्या मदतीने ( सफायर हाऊस, रुबी हाऊस, पर्ल हाऊस व यमरल्ड हाउस) विद्यार्थ्यांनी जबरदस्त परेड सादर केले. प्राचार्य जेबाबेरला नादर यांनी आलेल्या पाहुण्यांचे तसेच पालक, विद्यार्थ्यांचे स्वागतपर भाषण केले. सचिन पडिले यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या वीर महात्म्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सध्याच्या डिजिटल युगामध्ये आपली म्हणजेच विद्यार्थी, पालक, शिक्षक, समाजाची भूमिका काय आहे यावर प्रकाश टाकला. खेळाचे महत्त्व पटवून सांगताना ते म्हणाले की खेळाडूंसाठी नोकरीत 5 % आरक्षण आहे याचा फायदा विद्यार्थी तसेच पालकांना होणार आहे. यासाठी पाल्याच्या आवडीकडे लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी भाषणे, पिरॅमिड, कराटे, राष्ट्रभक्तीपर गाण्यावर नृत्य करत देशभक्ती जागृत केली. होळकर यांनी विद्यार्थ्यांना ‘हेल्थ इज वेल्थ’ ला प्राधान्य द्यावे, आपली प्रतिकार शक्ती वाढवावी असा मोलाचा सन्देश दिला. शेटे यांनी आपल्या भाषणात पुढील येणाऱ्या काळामध्ये जर टिकायचं असेल तर दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणं काळाची गरज आहे. मागील निकाल पाहता ही शाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत आहे. शाळेचे अनेक विद्यार्थी कमी कालावधीत उद्योगी बनले आहेत. अध्यक्षीय भाषणात संस्थाध्यक्ष मद्देवाड यांनी विद्यार्थ्यांना तसेच पालकांना उद्देशून मी कधीही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत कॉम्प्रमाईज केली नाही आणि पुढे करणारही नाही. नेहमी माझा हाच प्रयत्न असतो की विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन मिळावे हा माझा प्रामाणिक उद्देश आहे. येणाऱ्या काळात ही शाळा नक्कीच एक वेगळा आयाम घेऊन पुन्हा उभी राहील याची मला खात्री आहे. आपल्या शाळेला सैनिक स्कूलची मान्यता मिळेल. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असणार आहे. असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना यादव, विद्यार्थी रफुद्दिन सिद्दीकी, रमशा पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन संगमेश्वर ढगे यांनी केले. इस्माईल शेख, राहुल अडसूळ, विक्रम गायकवाड तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, सेवक, कर्मचारी यांनी मेहेनत घेतली. मोठ्या आनंदात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *