यशवंत विद्यालयाचे मुख्य लिपिक सोमनाथ स्वामी यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात साजरा
शैक्षणिक क्षेत्रात नाव कमावण्यासाठी कर्मचाऱ्यांनी झोकून काम करावे
आमदार विक्रम काळे यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय संस्कृतीमध्ये गेल्या अनेक पिढ्यापासून समाजामध्ये शिक्षकांना अत्यंत मानसन्मान दिला जातो. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेत आणि संस्थेत नाव कमावण्यासाठी स्वतःला झोकून देऊन काम करावे असे आग्रही प्रतिपादन मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केले.
ते दि.26 जानेवारी रोजी गिरजा गार्डन येथे यशवंत विद्यालयाचे मुख्य लिपिक सोमनाथ स्वामी यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यात मार्गदर्शन प्रसंगी बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण महर्षी डी.बी. लोहारे गुरुजी,व्यासपीठावर
प्रमुख अतिथी म्हणून भक्ती स्थळाचे प्रमुख परमपूज्य आचार्य गुरुराज स्वामी, मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माजी मंत्री विनायकराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ.अशोकराव सांगवीकर, शांतिनिकेतन पतसंस्थेच्या माजी चेअरमन पुष्पाताई लोहारे, सहसचिव प्रा.सुनिताताई चवळे, विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे, सहाय्यक शिक्षण उपसंचालक डॉ. दत्तात्रय मठपती, माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे सचिव शिवानंद हेंगणे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सांब महाजन, एडवोकेट विश्वंभरराव गुणाले, मदनराव धुमाळ, जब्बार सगरे, डॉक्टर महेश पडसलगे, प्रा. अंकुश नाडे, प्राचार्य गजानन शिंदे, सत्कारमूर्ती सोमनाथ स्वामी, सौ विजयाताई स्वामी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी सेवानिवृत्त बद्दल शाळेच्या वतीने सोमनाथ स्वामी आणि सौ विजयाताई स्वामी यांचा शाल, श्रीफळ आणि भर आहेर देऊन शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, आमदार विक्रम काळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या समयी डॉक्टर गणपत मोरे, प्राध्यापक डॉक्टर सुनीता ताई चवळे, प्रा.रवी ईरफळे, डॉ.नेहा कानडे- स्वामी यांचे मनोगत पर भाषणे झाली,
यावेळी माझे मंत्री विनायक पाटील माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांची शुभेच्छा पर आणि भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी यांचे आशीर्वचन पर मार्गदर्शन झाले. शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी यांच्या भाषणाने समारोप करण्यात आला.
सत्कारमूर्ती सोमनाथ स्वामी यांचे मनोगत पर भाषण झाले.
प्रास्ताविक प्राचार्य गजानन शिंदे यांनी सूत्रसंचालन कपिल बिराजदार आणि वर्षाताई माळी यांनी तर आभार राजकुमार पाटील यांनी मांनले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधव वाघमारे, प्रा. मुजमिल सय्यद, राम तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी, प्रा. गणेश मुस्तापुरे राजेश्वर पारशेट्टे ,बालाजी सोनटक्के, माधव भोजराज यांच्यासह यशवंत विद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.