फैज़-ए-आम चे सामाजिक कार्य निश्चितच अभिमानास्पद आहे – डि वाय एस पी – मनिष कल्याणकर
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील फैज -ए-आम चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचे कार्य मी मागील काही वर्षांपासून जवळून पाहत आहे.या संस्थेमार्फत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप असो भव्य वक्तृत्व स्पर्धा असो रमजान या पवित्र महिन्यात वाटप होणारे एका महिन्याचे राशन असो की आजच्या सारखे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबीर असो हे सर्व कार्य या संस्थेमार्फत कोणाकडूनही एक रूपयाची देणगी न घेता घडतात.ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन अहमदपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष कल्याणकर यांनी केले.
ते आज फैज -ए-आम चॅरिटेबल ट्रस्ट अहमदपूरच्या वतीने अब्दुल गणी काॅम्पलेक्स याठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.या शिबिराच्या अध्यक्षस्थानी अजहरभाई बागवान हे होते तर याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब जाधव अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर,उस्मान बिन अफ्फान मदरशाचे नाजीमसाब मौलाना अख्तर साहब, मुफ्ती मोहम्मद फाजिल कासमी, प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉ पांडुरंग कदम, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ वैभव रेड्डी,मोहसीन बायजीद आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना कल्याणकर म्हणाले की समाजाला अशा प्रकारच्या स्वंयसेवी संस्थांची खूप गरज आहे जे समाजोपयोगी कामे स्वतःहून पुढाकार घेऊन करतात.यावेळी मोहसीन बायजीद यांनी प्रास्ताविकात फैज -ए-आम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षी घेण्यात येणा-या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली.तर माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी ट्रस्टच्या कामगिरीचे तोंडभरून कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फहिम सलीम शेख यांनी केले तर आभार…..यानी मानले.यावेळी १११ बाटल्यांचे रक्त संकलन झाले व हे संकलन विलासराव देशमुख सर्वोपचार शासकीय रूग्णालय लातूर यांच्या कडे जमा करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फैज -ए-आम चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव,पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.