पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते भरोसा सेल इमारतीचे उद्घाटन

0
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते भरोसा सेल इमारतीचे उद्घाटन

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते भरोसा सेल इमारतीचे उद्घाटन

लातूर (एल.पी.उगीले) : पोलीस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेल-अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष इमारतीचा लोकार्पण सोहळा 31 जानेवारी रोजी पार पडला.
पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथील भरोसा सेल व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष साठी बांधण्यात आलेल्या “भरोसा” या इमारतीचा उद्‍घाटन सोहळा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पार पडला. या वेळी जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अधीक्षक अभियंता डॉ.सलीम शेख, यांच्यासह पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी-अमलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने पळून गेलेल्या मुला-मुलींचा भारताच्या विविध राज्यातून ठीक ठिकाणी शोध घेऊन त्यांना पालकाच्या स्वाधीन केले आहे. तसेच भरोसा सेल कडून सन 2024 या वर्षात कौटुंबिक कलहाच्या 803 प्रकरणापैकी 491 प्रकरणात समेट घडवून आणली आहे. त्यांचे कुटुंब तुटण्यापासून वाचवले आहेत, अशी माहिती देण्यात आली. या वेळी समेट घडवून आणलेले दांपत्य, जेष्ठ नागरिक, भरोसा सेलचे पोलीस अधिकारी-अमलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
मार्गदर्शनपर भाषणामध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लातूर पोलिसांकडून महिला, बालके व ज्येष्ठ नागरिका संदर्भात होत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून पोलिसांच्या “इन्स्पेक्टर दामिनी” या चित्रकथा पुस्तिकेचे कौतुक करुन लातूर पोलीस दलास शुभेच्छा दिल्या आहेत.
सदरची “भरोसा” ही इमारत जिल्ह्याच्या डीपीडीसी फंडातून मंजूर करुन सार्वजनिक बांधकाम विभाग कडून तयार करण्यात आली असून अधिकृतरित्या ईमारतीचे लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले, आभार प्रदर्शन पोलीस उपअधीक्षक (गृह) गजानन भातलवंडे यांनी मांडले. तर सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed