भाषिक अस्मिता असणा-या देशांनी प्रगती केली – कवी कदम यांचे प्रतिपादन

0
भाषिक अस्मिता असणा-या देशांनी प्रगती केली - कवी कदम यांचे प्रतिपादन

भाषिक अस्मिता असणा-या देशांनी प्रगती केली - कवी कदम यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : जापान, फ्रान्स,चीन,रशीया अशा कितीतरी देशांनी आपापली मातृभाषा जपली म्हणूनच ते जगातील प्रगत देश बनू शकले.भाषेची अस्मिता प्रगतीची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी राजेसाहेब कदम यांनी केले.
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अहमदपूर शाखेच्या वतीने १४ ते २८ जानेवारी या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ‘ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.याच्या समारोपाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कवी कदम यांना पाचारण करण्यात आले होते .यावेळी बोलताना त्यांनी वरील विचार मांडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखा व्यवस्थापक श्रीमंत वाघमारे होते.
पुढे त्यांनी ‘पंधरवाडा साजरा केल्याने नव्हे तर कायमच मातृभाषेत बोलण्याचा निश्चय केला तरच भाषा टिकू शकते’ यावर भर दिला. मराठी भाषा ही जगातल्या अत्यंत प्राचीन भाषेपैकी एक आहे. मराठी साहित्य हे प्रगल्भ असून, सामाजिक भान , विविधता मराठी साहित्यातून आपणास दिसते त्यामुळे आपण जे जगतो तीच भाषा आपण वापरली पाहिजे असे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात आपल्या विविध आशय-विशयांनी नटलेल्या कविता ऐकवून त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली.अध्यक्ष वाघमारे यांनीही यावेळी बहुमोल मार्गदर्शन केले.पंधरा दिवसांत घेतलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ब्रह्मदेव सपकाळे यांनी,आभार विकास अधिकारी तन्मय जाधव यांनी तर पाहुण्यांचा परिचय विकास अधिकारी मोहिब कादरी यांनी करुन दिला.यावेळी रसिक बहुसंख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed