जानकी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील जानकी महाविद्यालयात रविवार,दि. २६ जानेवारी रोजी अतिशय उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन समारोहाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप खोमणे होते तर या समाराहोचे उद्घाटक म्हणून मा. बालाजी शिंदे (सेवानिवृत्त केंद्र प्रमुख) उपस्थित होते. यावेळी मंचावर संस्थेच्या उपाध्यक्षा शीतल खोमणे, सुनंदा कुलकर्णी(माजी मुख्याध्यापिका), दादासाहेब पाटील(सेवा निवृत्त शिक्षक, खंडाळी), कलावती भातंब्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केतन खोमणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख दीक्षा लामतुरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व विद्येची देवता सरस्वतीचे पूजन करून करण्यात आली. यानंतर सांस्कृतिक विभाग प्रमुखांनी दिवसभरातील कार्यक्रमाची रूपरेषा सादर करत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. महाविद्यालयातील प्रतीक्षा कांबळे, दिव्या सुरनर, अंजली कांबळे, श्रद्धा धडे आदी विद्यार्थींनी आपल्या नृत्यकलेने उपस्थितांची वाहवा मिळवली. शेख फिरदोस या विद्यार्थिनीने उत्कृष्ट शायरी सादर करत सर्वांची दाद मिळवली. सुचिता सोळंके, प्रतीक्षा मुस्तापुरे यांनी गीत गायन करत उपस्थित सर्वाना मंत्रमुग्ध केले. प्रतीक्षा मुस्तापुरे, अश्विनी मोरे, सोनाली वाडेकर यांनी कविता सादर केल्या. या सर्व विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक विभाग प्रमुख दीक्षा लामतुरे, प्रा. वैष्णवी आगलावे, प्रा.रोहिणी मजगे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कलाप्रकाराची तयारी केली. या कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे व प्रेक्षक यांचे आभार प्रा. अजय स्वामी यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आकांक्षा जगताप आणि प्रा.जोहरा देशमुख यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. सुचिता हारे, सलीम पठाण, प्रा. प्रदीप गिरी, गोपाळ म्हेत्रे, विद्यासागर धुळगुंडे, प्रसाद गुंडरे, प्रसाद सूर्यवंशी, पांडुरंग रुद्रवाड, वामन मुरकुटे, रोहित कांबळे, रिहाना किनेवाड, उद्धव बेंबडे, श्रीमती. उमादेवी गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.