उदगीरची सर्वागीण परंपरा जतनात महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा मोलाचा वाटा- आ.संजय बनसोडे
उदगीरची सर्वागीण परंपरा जतनात महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा मोलाचा वाटा- आ.संजय बनसोडेउदगीरची सर्वागीण परंपरा जतनात महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा मोलाचा वाटा- आ.संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित “उदयोत्सव 2025” च्या समारोपात बोलताना आ.संजय बनसोडे म्हणाले, उदयगिरी महाविद्यालयाने या परिसराची राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राची परंपरा जपण्याचे कार्य केले आहे, ते अभिमानास्पद आहे. समारोप सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत रेड्डी (आयपीएस, उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर), तसेच गायक रामप्रसाद उंबरे (वडवणी, जि. बीड) यांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रामचंद्र तिरुके हे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये सहसचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सदस्य प्रशांत पेन्सलवार, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, उपप्राचार्य एस. जी. पाटील आणि एस. जी. कोडचे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रभारी डॉ. एस. एन. लांडगे, विद्यापीठ प्रतिनिधी सुप्रिया जगताप यांचा समावेश होता. वार्षिक स्नेहसंमेलन काळात पार पडलेल्या विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्पर्धांच्या विजेत्यांना गौरवण्यात आले. आयपीएस अधिकारी चंद्रकांत रेड्डी म्हणाले, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाने सांस्कृतिक परंपरा जपण्याचे कार्य पाहून समाधान व्यक्त केले. त्याबरोबरच आधुनिक काळातील तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करून स्वतःला काळानुरूप विकसित करून घेतले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात रामभाऊ तिरुके म्हणाले, विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक उपक्रमात सहभागी होऊन यश प्राप्त करावे. त्याबरोबरच अभ्यासाच्या बळावर अधिकारी होण्याचे स्वप्न पहावे. इतर मान्यवरांनी त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा दिली.
