लोकशाही बळकट करण्याचा विचार मानवी हक्कातून पुढे जातो – डॉ. संजय कोनाळे
उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय संविधान हे जगातील सर्व देशाच्या संविनांपेक्षा वेगळे आहे. स्वातंत्र्य,समता, बंधुता व न्याय ही भारतीय लोकशाहीची मुल्य आहेत. भारतीय लोकशाही विकसनशील मार्गाने पुढे जाणारी संरचना आहे. संविधान कर्त्याने या सर्व मानवी मूल्याचा अंतर्भाव राज्यघटनेमध्ये केला म्हणूनच आपण आनंदाने जीवन जगत आहेत.देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू व राज्यघटनेचे निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवी जीवनाच्या विकासाला पूरक असे कार्य केले. असे प्रतिपादन राज्यशास्त्र विभागातील सहयोगी प्रा. डॉ.संजय कोनाळे यांनी मौजे बामणी येथील रासेय शिबिरात काढले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विभागातील सहकार्यक्रमाधिकारी प्रा. ए. सी.आकडे होते. तर विचार मंचावर मुख्य कार्यक्रमाधिकारी प्रो.डॉ.शिंदे एस.व्ही., डॉ नीटुरे एस.डी.होते. पुढे बोलताना डॉ. कोनाळे म्हणाले की, भारतीय संविधान आणि मानवी हक्क यांचे जवळचे नाते आहे. ते टिकले तरच भारतीय लोकशाही जिवंत राहील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन एस एस विभागाचे एनएसएस विभागाचे स्वयंसेवक रत्नदीप शिंदे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय प्रेम कांबळे यांनी करून दिला. आभारप्रदर्शन ऋषिकेश पवार यांनी केले.यावेळी स्वयंसेवक, ग्रामस्थ, महाविद्यालयातील कर्मचारी तुकाराम चौधरी, दिलीप बिरादार यांची उपस्थिती होती.