आर्थिक साक्षरता काळाची गरज : डॉ. सी.जे. देशमुख

0
आर्थिक साक्षरता काळाची गरज : डॉ. सी.जे. देशमुख

आर्थिक साक्षरता काळाची गरज : डॉ. सी.जे. देशमुख

उदगीर (एल.पी.उगीले) : पैशाच्या व्यवहाराचे स्वतंत्र ज्ञान मानवाला होणे म्हणजे आर्थिक साक्षरता होय. पैशाचे योग्य नियोजन मानवाला करता आले पाहिजे.ही व्यावहारिकता व ज्ञान ज्या व्यक्तीकडे आहे, अशीच व्यक्ती आपल्या जीवनात सुखी व आनंदी होऊ शकते. बजेट, कर्ज, गुंतवणूक याचे ज्ञान प्रत्येक भारतीय माणसाला व्हावे. यासाठी साक्षरतेचे वर्ग शासन पातळीवर चालविले जावेत, असे प्रतिपादन डॉ. सी.जे.देशमुख यांनी केले. मौजे बामणी या दत्तक गावी सुरु असलेल्या रा.से.यो विभागाच्या शिबिरात ते बोलत होते. शिवाजी महाविद्यालयीत विभागातील सहकार्यक्रमाधिकारी प्रा.ए.एसी.आकडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विचारमंचावर प्रो.डॉ. सुरेश शिंदे मुख्य कार्यक्रमाधिकारी,सहकार्यक्रमाधिकारी डॉ. एस. डी.निटुरे होते. आर्थिक साक्षरता या विषयावर बोलताना डॉ.देशमुख म्हणाले की, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया यामुळे आपली भरभराट होणार आहे. त्यासाठी प्रत्येक माणसाने या संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. अध्यक्षीय समारोपात डॉ. आकडे म्हणाले की, आर्थिकदृष्ट्या साकार होण्यासाठी शेअर्स मार्केट, मिच्युअल फंड व गुंतवणुकीच्या विविध नफा विषयक साधनांमध्ये आपण विचारपूर्वक आर्थिक नियोजनाचा सुयोग्य वापर केला तर निश्चितपणे फायदा होईल असे विचार या प्रसंगी काढले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नदीप शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन अमित गोरेलाल यांनी केले. कार्यक्रमासाठी तुकाराम चौधरी, दिलीप बिरादार व स्वयंसेवक उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!