मंत्रीपद नसले तरी मतदार संघात विकासाचा रथ थांबू देणार नाही – आ. संजय बनसोडे

0
मंत्रीपद नसले तरी मतदार संघात विकासाचा रथ थांबू देणार नाही - आ. संजय बनसोडे

मंत्रीपद नसले तरी मतदार संघात विकासाचा रथ थांबू देणार नाही - आ. संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : गेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघातील जनतेनी मला प्रचंड मतांनी निवडून दिले.मी काही जरी केले तरी मतदारांचे ऋण फेडू शकणार नाही. यावेळी मंत्रीपद नाही म्हणून विकास होणार की नाह? अशी शंका मनात बाळगण्याचे कारण नाही.
मंत्रीपद नसले तरी आपल्या मतदारसंघाचा विकास कुठल्याही परिस्थितीत थांबु देणार नसल्याची ग्वाही माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे.
ते उदगीर तालुक्यातील मौजे देवर्जन येथील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात बोलत होते.
यावेळी देवर्जन ग्रामस्थांच्या वतीने आ. संजय बनसोडे यांचा फेटा, शाल व पुष्पहार घालुन भव्य सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवर्जनचे सरपंच अभिजीत साकोळकर होते, तर व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, इब्राहिम देवर्जनकर, संजय पाटील, कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष दयानंद रोडगे, सचिव राम बिरादार, उपसरपंच वैजनाथ वाडीकर, शंकरतात्या रोडगे, शिवहार रोडगे, प्रा. डॉ. बस्वराज धोतरे, अनिल रोडगे, संजय हाडोळे, पंढरी मोरे, सलीम शेख, रामस्वामी कुसळकर, तुकाराम खटके, नारायण पाटील, दत्ता खटके, बाळासाहेब पाटील, सिध्दार्थ गिलचे, तानाजी पिटले, हंसराज कांबळे, महादेव रोडगे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, गेल्या पाच वर्षांमध्ये आपण मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले असुन मागील ५ वर्षाच्या काळात मतदार संघात सहा हजार कोटी रुपयाचा विकास निधी खेचुन आणला. देवर्जन व परिसरात कोठ्यावधी रुपयाचा निधी दिला. साडेचार कोटीची कामे आता आपल्या गावात सुरू होत आहेत. आवश्यकतेनुसार आणखी निधी मंजूर करणार आहे.जात, धर्म, पंथ न बघता त्यांचे काम बघून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये लोकांची सेवा करणाऱ्या नेतृत्वाला संधी द्या. देवर्जन गावाने भरभरून मला मतदान दिले, या मतदान रुपी आशीर्वादाचे निश्चितपणे मी विकास कामे करून सोने करणार आहे. सर्वांना सोबत घेऊन मतदार संघाचा विकास करण्यासाठी मी कटीबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमासाठी अरविंद गिलचे, विनोद रोडगे, पवन खरात, शाहीद मोमीन, बालाजी हाडोळे, विनोद पाटील, अंतेश्वर रोडगे, गंगाधर दवणीपुरगे, माधव गिलचे, राम शिंगरुपे, शैलेश पाटील आदींनी पुढाकार घेतला.
या कार्यक्रमास देवर्जनसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!