दोन सख्या बहिणींनी गाजवले आर्चरीचे मैदान, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
दोन सख्या बहिणींनी गाजवले आर्चरीचे मैदान, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
उदगीर (एल.पी.उगीले) : यवतमाळ दिग्रस येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर धनुर्विद्या स्पर्धेमध्ये उदगीर तालुक्यातील मलकापूर येथे राहणाऱ्या दोन सख्या बहिणींनी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळावीला.
जान्हवी पवार हिने महाराष्ट्र राज्यात इंडियन प्रकारात 665 गुण घेऊन ओव्हरऑल प्रथम क्रमांक मिळावीला तसेच 40मीटर मध्ये 335 गुण घेऊन सुवर्ण पदक , 30मीटर मध्ये 330 गुण घेऊन सुवर्ण पदक प्राप्त केले. तसेच वैयक्तिक इलिमिनेशन प्रकारात सुवर्णं पदक घेऊन जान्हवी महाराष्ट्रात जुनिअर चॅम्पियन ठरली. व मिक्स टीम प्रकारात पंकज तौर व जान्हवी पवार यांनी सुवर्णं पदक प्राप्त केले. असे जान्हवी ने 4 सुवर्णं पदकांची कमायी केली.
वैष्णवी पवार ने रिकर्व्ह प्रकारात 656 गुण घेत ओव्हरऑल प्रथम क्रमांक मिळविला, तसेच वैयक्तिक सुवर्णं तर मिक्स टीम मध्ये आदित्य चव्हाण व वैष्णवीने सुवर्णं पदक प्राप्त केले.
वैष्णवी पवार व जान्हवी पवार या दोघी सख्या बहिणी महाराष्ट्राच्या चॅम्पियन झाल्या. तसेच जुनिअर राष्ट्रीय स्पर्धेसाठी दोघींची निवड झाली. या स्पर्धा बोलपूर वेस्ट बंगाल येथे 10 ते 15 फेब्रुवारी रोजी होणार आहेत.
वैष्णवी व जान्हवी गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडेमी मध्ये प्रशिक्षक सुधीर पाटील, सुषमा पवार व मारोती बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. वैष्णवी ला पुनीत बालन ग्रुप यांच्या मदतीमुळे तीला हे यश गाठाणे शक्य झाले आहे. दोघींना संघटनेचे पदाधिकारी अशोक जंगमे, राजेश देवकर तसेच क्रीडा प्रेमी गजानन पवार, आजोबा गोविंद पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
