कु.वैष्णवी श्रीकांत पाटील चा नांदेड विद्यापीठातर्फे सत्कार संपन्न
कु.वैष्णवी श्रीकांत पाटील चा नांदेड विद्यापीठातर्फे सत्कार संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने शिवाजी महाविद्यालय उदगीर ची विद्यार्थिनी कु.वैष्णवी श्रीकांत पाटील हिचा शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. मनोहर चासकर , डॉ.ज्ञानेश्वर पवार प्र- कुलगुरू यांच्या हस्ते युवक व क्रीडा मंत्रालय भारत सरकार द्वारे आयोजित केलेल्या विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025 या स्पर्धेत संपूर्ण भारत देशातून 30 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यात भारतमंडपम दिल्ली येथे बहुस्तरीय निवड प्रक्रियेद्वारे भारत देशातून निवडलेल्या 3000 विद्यार्थ्यांमध्ये कु.वैष्णवी श्रीकांत पाटील यांची निवड करण्यात आली होती. त्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात झाला. यावेळी विचार मंचावर राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगीकर , क्रीडा संचालक डॉ.भास्कर माने, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. या सत्कार प्रसंगी सत्कारमूर्तीचे वडील श्रीकांत पाटील, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ सदस्य महाराष्ट्र राज्य डॉ.नरसिंग कदम, प्रा.बालाजी सूर्यवंशी,डॉ उर्मिला शिरशी यांची उपस्थिती होती. तिच्या ह्या निवडीबद्दल व सत्कार झाल्याबद्दल परिसरातून सगळीकडे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
