स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव – आ.संजय बनसोडे
स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव - आ.संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या आनंदाचा उत्सव असतो. त्यातून अनेक कलावंत तयार होत असतात. ब्रिलियंट इंग्लिश स्कूलने अतिशय सुंदर असे नियोजन करून स्नेहसंमेलनाचे आयोजन केले. यामुळे या स्कूल मधून अनेक कलावंत तयार होतील असे मत माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री आ.संजय बनसोडे आणि व्यक्त केले.
शिवधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित ब्रिलियंट इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन ओमकार फंक्शन हॉल येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती प्रीती चंद्रशेखर भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आ. संजय बनसोडे तर मंचावर शिवधारा संस्थेचे अध्यक्ष व ब्रिलियंट स्कूलचे प्राचार्य राजकुमार हरकरे, शिवकुमार हसरगुंडे,शंकरप्पा हरकरे, संस्थेच्या सचिव सौ.जयश्री शेटे, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती अनिता हैबतपुरे, बालाजी भोसले, प्रा.प्रवीण शेट्टी, डॉ.म.ई.तंगावार, प्रा.मनोहर भालके, डॉ.अमित कवठाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय सौ.जयश्री शेटे यांनी करून दिला.वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यार्थी अष्टपैलू बनतात. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते, असे विचार उद्घाटनपर भाषणात श्रीमती प्रीती चंद्रशेखर भोसले यांनी व्यक्त केले. यावेळी सौ.अनिता हैबतपुरे यांनी देखील विचार मांडले.
कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सामाजिक, धार्मिक अशा विविध गीतावर उत्कृष्ट व प्रेरणादायी सादरीकरण केले. वर्षभरात विविध क्षेत्रात पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांचे असते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती प्रगती बिरादार, श्रीमती सुप्रिया गोरे, स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन श्रीमती सरिता गबाळे तर आभार राजकुमार हरकरे यांनी मानले.
