भारतीय संविधानाचे लातूरमध्ये ठाकरे शिवसेनेकडून पूजन शिवसैनिकांनी केला संविधानाचा जयजयकार!

भारतीय संविधानाचे लातूरमध्ये ठाकरे शिवसेनेकडून पूजन शिवसैनिकांनी केला संविधानाचा जयजयकार!
लातूर (प्रतिनिधी) : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाले आहे त्यानिमित्ताने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भारतीय संविधान उद्देशीका प्रतीचे पूजन जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले
भाजपाचे अमित शहा आणि काही नेते संवीधान बदलण्याची भाषा करत आहेत त्या क्रूर प्रवृत्तीच्या नेत्यांचा व त्यांच्या पक्षाचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आला
आणी भारतीय संविधानाचा जयजयकार करण्यात आला यावेळी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, उपजिल्हाप्रमुख बालाजी जाधव महानगर प्रमुख सुनील बसपुरे, युवा जिल्हा अधिकारी दिनेश जावळे शहरप्रमुख विष्णूपंत साठे, रमेश माळी, बसवराज मंगरूळे, अनिल स्वामी, त्र्यंबक स्वामी, विलास लंगर, मुनीरखाँन पठाण, भास्कर माने,प्रदीप बनसोडे, निलेश कढाळे, राजाभाऊ घरटमल, सुरज बाहेती, मारुती सुर्यवंशी, ऋषिकेश पाटील, प्रदीप उपासे, तानाजी करपुरे, करण शिंदे व शिवसेना युवासेना महिलासेना शाखाप्रमुख शिवसैनिक उपस्थित होते.