मोबाईल खेळापेक्षा विद्यार्थीनी मैदानी खेळ खेळावेत – ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी
लातूर : हासेगाव येथील श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेच्या लातूर कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने आयोजित वार्षिक क्रीडा उत्सव “खेळ भरारी 2025” चा शुभारंभ महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या हस्ते झाला.
यावेळी सोमवंशी यांनी विद्यार्थ्यांनी आपण आपल्या आयुष्यात जिद्द बाळगून ध्येय साध्य करावे तसेच मोबाईल फोन चा वापर कमी करुन मैदानी खेळाकडे सुधा लक्ष द्यावे असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास धानोरा येथील सरपंच श्री. सूर्यकांत मुसळे सर, श्री वेताळेश्वर बावगे (सचिव, श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था), मा. श्री. वैजनाथ राठोड (हसेगाव सरपंच), गोरे सर (ज्ञानसागर विद्यालय, हसेगाव), आणि मुलगे सर यांचीही मान्यवर उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची प्रस्तावना नंदकिशोर बावगे सर यांनी केले, तर सूत्रसंचालन श्रद्धा तरके आणि भक्ती परळे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.
या क्रीडा महोत्सवाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, आणि सामाजिक विकासाला प्रोत्साहन देणे असून, खेळाच्या माध्यमातून नेतृत्वगुण, कर्तव्यनिष्ठा, आणि संघभावना विकसित करण्याचा प्रयत्न आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लातूर कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्य, प्राध्यापक, आणि कर्मचारी वर्गाने मोलाचे योगदान दिले.