4 फेब्रुवारी रोजी जागतिक सूर्य नमस्कार दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या मैदानावर सामुदायिक सूर्यनमस्कार
4 फेब्रुवारी रोजी जागतिक सूर्य नमस्कार दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या मैदानावर सामुदायिक सूर्यनमस्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : 4 फेब्रुवारी रोजी जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक संघ व पतंजली योग समिती उदगीरच्या वतीने शालेय विद्यार्थ्याकडून सूर्य नमस्कार सादरीकरण होणार आहे. भारतातील प्राचीन सनातन संस्कृतीचा व बलोपासनेचा एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्वतःचे आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, नियमित व्यायामाचे सवय लागावी या उद्देशाने गेल्या कित्येक वर्षापासून हा उपक्रम राबवण्यात येतो. तालुक्यातील जवळपास सर्वच शाळांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. दीड हजार ते दोन हजार विद्यार्थी संख्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी शाळांनी आयोजकांना कळवलेले आहे. त्या संदर्भामध्ये काही शाळांचे प्रातीनिधिक स्वरूपामध्ये सादरीकरण होणार आहे.तर बाकी सर्वच विद्यार्थ्यांचा सामूहिक सूर्यनमस्कार अविष्कार त्या दिवशी त्या त्या शाळेमधून साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी उदगीर चे लोकप्रिय आमदार संजय बनसोडे, उपविभागीय अधिकारी सुशांत जी शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर , पोलीस निरीक्षक (शहर) अभिषेक शिंदे , नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सुंदर बोंदर त्याचबरोबर उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक संघातील आणि पतंजली योग समितीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे बळ वाढवावे. असे आवाहन पतंजली योग समिती परिवार यांच्यामार्फत करण्यात येत आहे.
