स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते – अमोल निडवदे
स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते - अमोल निडवदे
उदगीर (एल.पी.उगीले) : लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात सुरू झालेल्या स्नेहसंमेलनाची सांगता बक्षीस वितरणाने व स्नेहभोजनाने झाली.
या बक्षीस वितरण सोहळ्याला अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे अमोल निडवदे ,सुनील वसमतकर ,चंद्रशेखर पाटील, माजी विद्यार्थी प्रसाद नाईकवाडे, विद्यार्थी प्रतिनिधी श्रेया सुनील कुलकर्णी ,विश्वजीत गोपाळकृष्ण घोडके, स्नेह संमेलन प्रमुख किरण नेमट, सहप्रमुख आशा मोरे, उपमुख्याध्यापक अरुण पत्की, पर्यवेक्षक कृष्णा मारावार ,माधव मठवाले उपस्थिती होते.
प्रमुख पाहुणे अमोल निडवदे यांनी आपल्या मनोगतातून स्नेहसंमेलन म्हणजे विविध कलागुणांचे सादरीकरण असे वक्तव्य केले .
प्रमुख पाहुणे सुनील वसमतकर यांनी शालेय अभ्यासक्रमासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांमधून विविध कला, क्रीडा, भाषण यात भाग घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे वक्तव्य केले. व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
चंद्रशेखर पाटील यांनी समाजामध्ये जीवन जगत असताना स्वतःच स्वतःची ओळख निर्माण करा. असा मोलाचा संदेश दिला.
अध्यक्षीय समारोपात विद्यालयाचे मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे यांनी
विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट काम करून नावलौकिक मिळवला पाहिजे, आपली विशेष ओळख निर्माण केली पाहिजे, असे सांगितले. सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले
ज्ञानोपासक ,कलोपासक ,बलोपासक संस्कार व विज्ञान मंडळा अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे याप्रसंगी कौतुक करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप बोधनकर यांनी तर स्वागत व परिचय मयूर कुलकर्णी, आशा मोरे प्रस्ताविक पर भाषण केले. आभार किरण नेमट यांनी व्यक्त केले जान्हवी देशमुख यांच्या कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
