शासकीय अध्यापक महाविद्यालय, उदगीर येथे दुधाचे फायदे आणि रॅबीजसाठी जनजागृती कार्यकम
शासकीय अध्यापक महाविद्यालय, उदगीर येथे दुधाचे फायदे आणि रॅबीजसाठी जनजागृती कार्यकम
उदगीर (एल.पी.उगीले) : शासकीय अध्यापक महाविद्यालय, उदगीर येथे दुधाचे फायदे आणि रॅबीज विषयी जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा विशेष उपक्रम डॉ. एन झेड गायकवाड, सहयोगी अधिष्ठाता, पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली रेबीज जागृती अभियान आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. मोहम्मद रझियुद्दीन आणि डॉ. अशोक भोसले यांनी मार्गदर्शन केले. डॉ. रझियुद्दीन यांनी दुधाच्या पोषणतत्त्वां विषयी माहिती दिली आणि सांगितले की, “दूध हे प्रोटीन, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांचा उत्कृष्ट स्रोत आहे, जे शरीराच्या सर्वांगीन विकासासाठी आवश्यक आहे.”
कार्यक्रमात रॅबीजवरील जनजागृती साठी डॉ. अशोक भोसले यांनी महत्त्वपूर्ण विचार मांडले. त्यांनी रॅबीजच्या लक्षणांबद्दल सांगितले आणि लसीकरणाच्या महत्वावर भर दिला, “रॅबीज एक जीवघेणा रोग आहे, आणि त्यापासून बचावासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इम्रान खान पठाण, अजित लिंबकर, सचिन बोकन, अनिता पाटील आणि एस के शेख यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. तसेच, पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. महेश हंगरकर यांनी कार्यक्रमाच्या व्यवस्थापनात महत्त्वाची मदत केली. या कार्यक्रमात एकूण ८० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. उपस्थित विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यात यासारख्या जागरूकता कार्यक्रमांची आवश्यकता व्यक्त केली.
