मुर्की ग्रामपंचायतिच्या वतीने अरविंद बिरादार यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव
मुर्की ग्रामपंचायतिच्या वतीने अरविंद बिरादार यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव
उदगीर (एल.पी.उगीले) : सीमाभागातील कमालनगर तालुक्यातील मूळचे मुदखेडचे रहिवासी असलेले परंतु सध्या मूर्की येतील शासकीय माध्यमिक विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्य करत असलेले मराठी विषयाचे शिक्षक अरविंद बिरादर यांचा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन, मुर्की ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला.उत्कृष्ट अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची गोडी निर्माण करणारा एक उत्तम शिक्षक म्हणून त्यांचे नावलौकिक आहे. मराठी विषयाचे संपन्नमूल व्यक्ती म्हणूनही ते कार्य करतात. एकूणच त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन मुर्की ग्रामपंचायतने शिक्षण क्षेत्रात आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन हा एक नवीन पायंडा घातला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. असा उपक्रम राबवणारी मूर्की ग्रामपंचायत ही तालुक्यातील कदाचित एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे.पंचायतचा पहिला पुरस्कार मिळाल्याबद्दल अरविंद बिरादार यांनी मूर्की ग्रामपंचायतचे अध्यक्ष, उपाध्यक्ष ,सर्व सदस्य व समस्त गावकरी मंडळी ,माजी विद्यार्थी ,शिक्षणप्रेमी मंडळी, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांचे आभार व्यक्त केले.
