अनुज फुलारी वुशु कुंग फु मार्शलआर्ट्स इंटरनॅशनल स्पर्धेत प्रथम
अनुज फुलारी वुशु कुंग फु मार्शलआर्ट्स इंटरनॅशनल स्पर्धेत प्रथम
उदगीर (एल.पी.उगीले) : वुशु कुंग फु मार्शलआर्ट्स चा खेळाडू सरदार वल्लभभाई पटेल सेमी इंग्रजी शाळेचा विद्यार्थी अनुज रवी फुलारी यांची निवड ग्रॅन्ड मास्टर बी चंद्रकांत बेंगलोर यांच्या अंतर्गत मुंबई इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत करण्यात आली होती.
या स्पर्धेत 300 खेळाडू नी सहभाग नोंदविला होता. यात 90 मुली व मुले 210 होती. व अनुज रवी फुलारी च्या वयोगटातील व वजन गटात 9 खेळाडू होते. या 9 खेळाडूवर मात देऊन परफॉर्मन्स सादर केला.वयोगट 6 ते 11 मध्ये व वजन गट 21 ते 25 मध्ये अनुज फुलारी ने गोल्ड मेडल मिळवून बाजी मारली, व मुंबई गाजवली . अनुज ला गोल्ड मेडल मिळवून देण्याचे काम उदगीर वुशु कुंग फु मार्शल आर्ट्स चे प्रशिक्षक सोळुंके मारोती मराठवाडा चिफ 5 डिग्री तसेच बालाजी सोळुंके यांनी अहोरात्र मेहनत घेऊन या खेळाडूंना गोल्ड मेडल मिळवून दिले. अनुज फुलारी च्या यशाबद्दल सरदार वल्लभभाई पटेल सेमी इंग्रजी विभाग प्रमुख सौं आशाताई बेंजरगे यांच्या हस्ते अनुज रवी फुलारीचा पुष्पहार, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अनुज फुलारीला मार्गदर्शन करणारे बालाजी सोळुंके यांचाही विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित राहून अनुज फुलारीला शुभेच्छा देऊन त्याचे कौतुक केले.
