लक्ष्मी पवार प्राथमिक व माध्यमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

लक्ष्मी पवार प्राथमिक व माध्यमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
उदगीर (एल.पी.उगीले) : मातोश्री पणाई सेवाभावी शिक्षण संस्था नाईक नगर उदगीर द्वारा संचलित लक्ष्मी पवार प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आदिवासी आश्रम शाळा, वंडगीर ( मुक्रमाबाद ) ता. मुखेड येथे शाळेतील विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
लक्ष्मी पवार प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आदिवासी आश्रमशाळा वंडगीर ( मुक्रमाबाद ) ता. मुखेड येथील स्नेहसंमेलनाच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्रमाबाद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके हे होते. कार्यक्रमाचे उदघाटन मुखेड पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती मुखेडचे शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप देवकते, पंचायत समितीचे विषय तज्ञ प्रेमदास पवार, गोजेगावचे केंद्रप्रमुख शिवाजी पाटील, मुक्रामाबादचे केंद्रप्रमुख डी .टी. अप्पाणे, मुक्रमाबाद शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक एस.आर.वाघमारे, वंडगीरचे केंद्रीय मुख्याध्यापक पी.एस.लाळे, वंडगीर शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष रामराव पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिताचे स्वागत मातोश्री पणाई सेवाभावी शिक्षण संस्था उदगीरचे संस्थापक अध्यक्ष अनिल पवार यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, संस्थेचे अध्यक्ष अनिल पवार यांच्या हस्ते स्नेहसंमेलनातील विविध कलागुणांत नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केलेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय गटांना व वैयक्तिक विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लक्ष्मी पवार प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आदिवासी आश्रम शाळा वंडगीर (मुक्रमाबाद) तालुका मुखेड शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद तसेच मुख्याध्यापक विष्णू नाईक, सतीश चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.