सन्मान मातृ शक्तीचा, सन्मान आधुनिक युगातील जिजाऊचा

सन्मान मातृ शक्तीचा, सन्मान आधुनिक युगातील जिजाऊचा
अहमदपूर (गोविंद काळे) : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीत्वाला आकार देणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त लातूर जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय पदक प्राप्त खेळाडूंच्या मातांचा सन्मान हा दरवर्षी प्रमाणे आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवराज माने कार्याध्यक्ष जिजामाता ज्ञान प्रसारक मंडळ अहमदपूर, प्रमुख अतिथी माननीय कविवर्य, पर्यावरण मित्र श्री अनिल चवळे सर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. दत्ताभाऊ गलाले व श्रीमती रेखाताई गलाले हे यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व मातृशक्ती ला मानाचा फेटा पुस्तक देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात शिवराज जी माने असे म्हणाले की, ज्याप्रमाणे जिजाऊने बाल शिवाजी वर संस्कार केले त्याचप्रमाणे या आजच्या आधुनिक युगात बालकांचे जीवन धोक्यात आहे मुलांना आपल्या कक्षेत ठेवणे अतिशय महत्त्वाचे झाले आहे तसेच बालपणीच आपण त्यांना घडवू शकतो. मोबाईल, मित्रपरिवार याकडे पालकांचे लक्ष असणे आवश्यक आहे.
प्रमुख अतिथी श्री कवी अनिल चवळे सर यांनी आई वर केलेल्या कवितेच्या काही ओळी यावेळी सादर केल्या. या आधुनिक युवा मुलांमधील कमी होत चाललेली सहनशीलता त्यांच्यातील वाढत असलेला राग, लोभ, मत्सर या गोष्टीचा अतिरेक त्यामुळे तरुण पिढी एका वेगळ्याच दिशेला जात आहे याची चिंता ही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्राध्यापक दत्ताभाऊ गलांडे यांनी व्यक्त केले व त्यांनी मंचाला अस्वस्थ केले की आमच्या मैदानावर झालेला प्रत्येक खेळाडू हा संस्कारीतच आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला खेळासोबत संस्काराचेही धडे दिले जातात. यावेळी आमचे मीत्र श्री. दिनकर गुट्ठे, श्री. धीरज भंडे, श्री. शिंगडे साहेब व इतर पालकवर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल अडसूळ यांनी केले.