कन्या प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

0
कन्या प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

कन्या प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

मुरूम (एल.पी.उगीले) : येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करून दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मंकावती कांबळे होत्या. याप्रसंगी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका अलका गायकवाड, शालेय शिक्षण समितीचे उमेश बिराजदार, माध्यमिकचे गुंडू पुराणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या कला सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. प्राथमिकच्या चिमुकल्यांच्या डान्सवर श्रोत्यांनी ठेका धरून कौतुक केले. यावेळी महाराष्ट्रातील विविध लोककलासह कन्नड, तेलगू व बंजारा गीतांवर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्यांचे सादरीकरण केले. मुख्याध्यापिका मंकावती कांबळे म्हणाल्या की, शालेय उपक्रमांमधील सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. हरी शेके, बालाजी गायकवाड, डॉ. वंदना जाधव, रेणुका कुलकर्णी, बीना पोतदार, सोनाली कलशेट्टी, रोहिणी चव्हाण, सविता साळुंखे, उमाकांत महामुनी, सचिन राठोड, बालाजी कुनाळे, अशोक गायकवाड, ललिता पवार, तात्या जाधव आदींनी पुढाकार घेतला. पालक आणि शिक्षक यांनी विद्यार्थिनींच्या कलागुणांचे कौतुक करून उत्कृष्ट नृत्य करणाऱ्या कलाकारांना बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाचा विद्यार्थी व पालकांनी आनंद लुटला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!