उदयगिरी अकॅडमी उदगीरचा स्तुत्य उपक्रम ज्ञान विज्ञान सह विरंगुळा सहल

0
उदयगिरी अकॅडमी उदगीरचा स्तुत्य उपक्रम ज्ञान विज्ञान सह विरंगुळा सहल

उदयगिरी अकॅडमी उदगीरचा स्तुत्य उपक्रम ज्ञान विज्ञान सह विरंगुळा सहल

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील नामांकित उदयगिरी अकॅडमीने शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे.ज्ञानार्जनासोबत ज्ञान विज्ञान यांची माहिती मिळावी हसत खेळत शिक्षण व विरंघूळा सहल वृदावनं गार्डन चाकूर येथे सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
ज्ञान विज्ञान गणिताचे धडे गिरवीत असताना विध्यार्थ्यांना मनसोक्त आनंद लुटता यावा विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील ताण कमी व्हावा माईंड फ्रेश व्हावे म्हणून प्रत्येक वर्षी या सहलीचे आयोजन करण्यात येते. अगदी माफक दरात उत्तम नियोजन करून विध्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी उदयगिरी क्लासेसचा हा अनोखा प्रयत्न असतो. विद्यार्थ्यांनी शिवालयाच्या दर्शनाचा व वृंदावन वॉटरपार्क येथे मनसोक्त पोहण्याचा आनंद घेतला.
ही सहल यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उदयगिरी अकॅडमीचे संचालक प्रा. गोपाळकृष्ण घोडके, प्रा. संतोष पाटील, प्रा.डॉ धनंजय पाटील , प्रा.सौ ज्योती खिंडे ,प्रा.श्रीगण रेड्डी , प्रा.गोविंद केंद्रे, प्रा.मीना हुरदळे,प्रा.नंदिनी निटूरे, प्रा. निवेदिता भंडारे व उदयगिरी अकॅडमीचे सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!