प्रहार जनशक्ती पक्षाच्या शहराध्यक्ष पदी शाहजहान ईस्माइल शेख यांची निवड
प्रहार जनशक्ती पक्षाच्या शहराध्यक्ष पदी शाहजहान ईस्माइल शेख यांची निवड
उदगीर (एल.पी.उगीले) : प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय कार्यकारणी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सर्वानुमते उदगीरचे कार्याध्यक्ष शाहजहान शेख यांची निवड बच्चूभाऊ कडू व जिल्हा प्रमुख राजाभाऊ चौगुले यांच्या आदेशानुसार उदगीर शहर अध्यक्षपदी करण्यात आली. निवडी चे पत्र जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे व तालुकाध्यक्ष रविकिरण बेळकुंदे यांच्या हस्ते देण्यात आले. येणारी नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्धार प्रहार सेवक च्या वतीने करण्यात आला .या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका संघटक सोपान राजे, सरचिटणीस संजय महापुरे, सुदर्शन सुर्यवंशी,शहर संपर्क प्रमुख अमित खंदारे, सचिव बालाजी बिरादार, उपाध्यक्ष इमरान शेख,मोहम्मद इमाम शेख प्रहार कामगार आघाडीचे शहरप्रमुख, अंतेश्वर बंडू सूर्यवंशी प्रहार कामगार आघाडी, देवणी तालुकाप्रमुख हसन इमाम शेख, प्रहार कामगार आघाडी उदगीर तालुका सचिव शिवाजी बिरादार , प्रहार युवा शहराध्यक्ष शेख जम्मू मुसा प्रहार कामगार आघाडी तालुका प्रमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते ,निवडी बदल शाहजहान शेख यांचे सर्व प्रहार सेवकाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
