साहित्य संमेलनात झळकणार “सृजन रंगकर्मी” चित्र प्रदर्शन,राज्यातील निवडक कलावंतांचे ‘सृजन रंगकर्मी’ कलादालनात चित्रप्रदर्शन
साहित्य संमेलनात झळकणार "सृजन रंगकर्मी" चित्र प्रदर्शन,राज्यातील निवडक कलावंतांचे 'सृजन रंगकर्मी' कलादालनात चित्रप्रदर्शन
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई व रंगकर्मी प्रतिष्ठान उदगीर आयोजित दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी श्री शिवाजी महाविद्यालय उदगीर येथे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या साहित्य संमेलनात “सृजन रंगकर्मीं” या नावाचे कलादालन उभा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील चित्रकार,कलावंत, कलाध्यापक व कलारसिक बंधूं भगिनींनी आपण साकारलेली कलाकृती या साहित्य संमेलनात प्रदर्शित करण्यासाठी ही अनमोल संधी संयोजकांनी कलावंत बंधूंना उपलब्ध करून दिले आहे. या दालनात चित्र प्रदर्शित करण्यासाठी ग्राफिक्स डिझायनर शिवाजी हांडे 9960065511, मंहादेव खळुरे 8796665555,चंद्रदिप नादरगे 8605776478, दिपक हालकंचे 9421343019 यांच्याशी संपर्क साधून आपली कलाकृती पाठवून द्यावेत.असे आवाहन साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर,कार्यवाह रामचंद्र तिरुके, रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिभीषण मद्देवाड, सिद्घार्थ सुर्यवंशी , रसुल पठाण ,रामदास केदार , आदींनी चित्र प्रदर्शनासाठी आवाहन केले आहे.
चित्र प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात येणारी चित्राची मूळ फोटो कॉपी हाय रेगुलेशन तीनशे डीपीआय (12×18) या साईज मध्ये इमेल किंवा व्हाट्सअप वर डॉक्युमेंट फाईल मध्ये पाठवावेत. सोबत आपले पूर्ण नाव, पासपोर्ट फोटो, संपर्क क्रमांक अशी माहिती पाठवून द्यावे. आपण पाठवून दिलेल्या निवडक चित्रांचा प्रदर्शनात समावेश केला जाणार आहे. प्रदर्शनास आपले चित्र लावण्यासाठी संमती पत्र द्यावे लागेल. सहभागी सर्व उपस्थित कलावंतांना सहभाग नोंदवल्याचे प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार असून या चित्र प्रदर्शनात सहभाग नोंदवण्यासाठी चिञप्रदर्शन दालन प्रमुख महादेव खळुरे यांनी आवाहन केले आहे.
