आंतरविद्यापीठ तायक्वांदो पदक विजेता सुमित राठोड व क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे यांचा सत्कार

0
आंतरविद्यापीठ तायक्वांदो पदक विजेता सुमित राठोड व क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे यांचा सत्कार

आंतरविद्यापीठ तायक्वांदो पदक विजेता सुमित राठोड व क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे यांचा सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त 2023-24 या वर्षासाठीच्या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन नांदेड येथे करण्यात आले. या गौरव समारंभात महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा आंतरविद्यापीठ तायक्वांदो पदक विजेता खेळाडू सुमित राठोड आणि क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते. त्यांच्या हस्ते सन्मानित खेळाडू व क्रीडा संचालक यांना स्मृतिचिन्ह, ब्लेझर आणि रोख रक्कम 8000 रुपये प्रदान करण्यात आली. सुमित राठोड यांनी तायक्वांदो क्रीडा प्रकारात आंतरविद्यापीठ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून पदक पटकावले. त्याच्या या यशाने महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे नाव प्रसिद्धी झोतात आले आहे. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिसभा सदस्य, सिनेट सदस्य, विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, विद्यार्थी तसेच क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव अ‍ॅड.एस.टी.पाटील चिघळीकर आणि डॉ.रामप्रसाद लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!