उदगीरच्या भाऊसाहेब सहकारी बँकेस ब्लू रिबन पुरस्कार प्रदान
उदगीरच्या भाऊसाहेब सहकारी बँकेस ब्लू रिबन पुरस्कार प्रदान
उदगीर (एल.पी.उगीले) सहकार व बँकींग क्षेत्रात उत्तम प्रकारे, दर्जेदार सेवा देणाऱ्या सहकारी बँकेस देण्यात येणारा बँको ब्लू रिबन पुरस्कार- 2024 हा पुरस्कार भाऊसाहेब सहकारी बँक लिं, उदगीरला लोणावळा येथील आंबी व्हॅली सिटीत आयोजित सोहळ्यात रिजर्व्ह बँकेचे माजी सीजीएम भार्गेश्वर बॅनर्जी, अविनाश शिंत्रे, नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या समारंभास भाऊसाहेब सहकारी बँकेचे चेअरमन भगवानराव रामचंद्रराव पाटील तळेगावकर व संचालक दिनेश पाटील यांनी उपस्थित राहून हा पुरस्कार स्विकारला. हा पुरस्कार या बँकेने सलग दुसऱ्यांदा प्राप्त केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मार्गदर्शन, सुचना व सहकार विभागाच्या सर्व नियमांचे पालन करून भाऊसाहेब सहकारी बँक प्रेरणादायी वाटचाल करीत आहे. प्रतिष्ठित असलेला बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार सतत दुसऱ्यांदा मिळाल्याने अतिशय आनंद होत आहे, बँकेच्या या यशस्वी वाटचालीत सभासद, ग्राहकांची मोलाची साथ व बँकेच्या कर्मचारी वर्गाने संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली केलेले काम, बँकेचे सर्व खातेदार व हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे बँकेस पुरस्कार प्राप्त झाल्याचे मत बँकेचे चेअरमन भगवानराव पाटील तळेगावकर यांनी
व्यक्त केले आहेत.
