श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण आणि चर्चा

0
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण आणि चर्चा

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण आणि चर्चाश्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण आणि चर्चा

मुरुम (एल.पी.उगीले) : श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील वाणिज्य विभागामार्फत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पाचे लाईव्ह थेट प्रक्षेपण वाणिज्य विभागामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.

या अर्थसंकल्पामधील सर्वसामान्य जनता, शेती, उद्योग, व्यापारी, नोकरदार आणि गुंतवणूक आदि क्षेत्रात अर्थसंकल्पातील बदलाच्या तरतुदींची सविस्तर माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी विद्यार्थ्यांना दिली. अर्थसंकल्पातील तरतुदी शेतकरी, उद्योजक, व्यापारी, सर्वसामान्य यांना फायदेशीर ठरणारा आह़े की नाही? याची अभ्यासपूर्ण माहिती संकलित करावी. येत्या दोन दिवसात या संपुर्ण अर्थसंकल्पाचे विश्लेषण करावे. आणि वाणिज्य मंडळाच्या वतीने चालू असलेल्या कॉमर्स बुलेटीन मध्ये प्रकाशित करावे. त्यानंतर गट चर्चा घ्यावी, असे आवाहन प्राचार्य अस्वले यानी केले. या कार्यक्रमाला डॉ. अजित आष्टे, प्रा. खंडू मुरळीकर, प्रा. अक्षता बिराजदार, प्रा. अंजली चव्हाण प्रा. संध्याराणी चौगुले व वाणिज्य विभागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!