दैवशाली टेंकाळे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा
दैवशाली टेंकाळे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील सुवर्णा माता देशमुख कन्या विद्यालयातील शिक्षिका दैवशाली टेंकाळे प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल शाळेतर्फे मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, भर आहेर देऊन सत्कार करण्यात आला. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरोजा पाटील, सुलाबाई पाटील ,सुमित्रा कोयले,, नरेंद्र पाटील, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्रा.प्रवीण जाहुरे, नागनाथ सकाये, मुख्याध्यापक हणमंत घोडके, अश्विनी निवर्गी, सुनंदा सरदार, सुनील क्षीरसागर, किशन उगले, रेवता जाधव, वर्षाराणी चौधरी यांची उपस्थिती होती.
यावेळी दैवशाली टेकाळे लिखित “भावनांकुर” पुस्तकाचे प्रकाशन प्रा.प्रवीण जाहुरे व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. शिक्षिका ,लेखिका, योगशास्त्राची जानकार ,शाळेसाठी समर्पित व्यक्तिमत्व अशा शब्दात त्यांच्या कार्याचा गौरव सर्वच वक्त्यांनी केला. यावेळी बोलताना प्रा. जाहूरे म्हणाले, भावनांकुर मध्ये विविध अनुभव ,व्यक्ती चित्रे सहज सोप्या भाषेत रेखाटली असून समाज प्रबोधन करणारे लेख आहेत .ते वाचकांच्या पसंतीस उतरतील .ग्रामीण ,वंचितांच्या मुलींसाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरक असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थिनीच्या वतीने सनाकाझी ,अनुष्का वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक हणमंत घोडके यांनी केले. सूत्रसंचालन बाबुराव पाटील यांनी केले, तर आभार विश्वंभर गव्हाणे यांनी मानले.
