राष्ट्रीय सेवा योजना बीनभिंतीची प्रयोगशाळा-डॉ.बी.एस.भुकतरे

0
राष्ट्रीय सेवा योजना बीनभिंतीची प्रयोगशाळा-डॉ.बी.एस.भुकतरे

राष्ट्रीय सेवा योजना बीनभिंतीची प्रयोगशाळा-डॉ.बी.एस.भुकतरे

उदगीर (एल.पी.उगीले) : शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष वार्षिक शिबीर मोजे बामणी या गावी सुरु आहे. यामध्ये संध्याकाळच्या सत्रात अंधश्रध्दा निर्मूलन या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यक्रमाधिकारी डॉ.एस.व्ही.शिंदे होते. यावेळी विचारमंचावर प्राचार्य विजयकुमार पाटील, बाबुराव माशाळकर, डॉ. बी. एस. भुकतरे यांची विशेष उपस्थिती होती. आपल्या मनोगतात यांनी रुढी, परंपरा, अंधश्रद्धा, देव, दैववाद या गोष्टींवर कडाडून प्रहार केले. प्रत्येक घटनेला कार्यकारणभाव असतो. तेव्हा चांगला माणूस घडण्यासाठी रासेयो शिबीर बीन भिंतीची प्रयोगशाळा असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. प्राचार्य पाटील यांनी राष्ट्राचा विकास, व मूल्यसंवर्धन करण्यासाठी रा. से. यो. विभाग महत्वपूर्ण भूमिका पार पाडीत आहे. शिबीराच्या माध्यमातून स्वयंसेवकाचे मनपरिवर्तन व्हावे. त्यांनी विज्ञानवादी बनून डोळस व्हावे, कर्म कांडाना गाडून टाकावे, असे मत या प्रसंगी मांडले. तर बाबुराव माशाळकर यांनी अंधश्रध्दा निर्मूलनाच्या पाठीमागील भूमिका विशद केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक जोगी यांनी केले तर, आभार प्रेम कांबळे तसेच पाहुण्यांचा परिचय हर्षदीप कुलकर्णी यांनी करून दिला. अध्यक्षीय समारोप डॉ. सुरेश शिंदे यांनी केला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात मानवाने विवेकवाद तसेच विज्ञानाची कास धरावी असे आवाहन केले. या कार्यक्रमास दिलीप बिरादार, तुकाराम चौधरी, ग्रामस्थ,रासेयो विभागाचे स्वयंसेवक उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!