डॉ. झाकीर हुसेन उर्दु हायस्कूल मध्ये स्वयंशासन दिन उत्साहात साजरा
डॉ. झाकीर हुसेन उर्दु हायस्कूल मध्ये स्वयंशासन दिन उत्साहात साजरा
मुरूम (एल.पी.उगीले) : येथील डॉ. झाकीर हुसेन उर्दु हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वंयशासन दिन उपक्रम शिस्तबद्ध आणि खेळीमेळीत संपन्न झाला. या दिनी विद्यार्थ्यांनी शालेय प्रशासनाचा अनुभव तर घेतलाच पण शिक्षक म्हणून अध्यापन करताना विद्यार्थ्यासमोर प्रत्येक शब्द किती जबाबदारीने वापरावा लागतो. हा अनुभवही तितकाच महत्वाचा ठरला, असे मनोगत शिक्षक बनलेल्या विद्यार्थिनीनी व्यक्त केले. आजचा हा अनोखा अनुभव देणारा आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरणार असल्याचा आनंद विद्यार्थिनीनी व्यक्त केला. अशा या सुंदर स्वंयशासन दिनाचे आयोजन करण्यात आले. स्वंयशासन दिनाच्या मुख्याध्यापिका म्हणून कु. हिना रहेमान जमादार, उपमुख्याध्यापिका बिबी मसिहा सय्यद नूरसे तर प्राथमिकच्या मुख्याध्यापिका म्हणून तस्मिया नसीर कुरेशी यांनी कार्यभार सांभाळला. उत्कृष्ट पाठ घेतलेल्या शिक्षकांचे व उत्कृष्ट कार्य केलेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. शाळेमध्ये स्वयंशासन दिनाचे सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी जेवणाचा उत्तम असा आनंद घेतला. माध्यमिकच्या मुख्याध्यापिका सय्यदा खुतेजा बेगम खतीब यांनी विद्यार्थ्याच्या आजच्या शिस्तबद्ध आयोजनाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील शिक्षक जुबेर अत्तार, इम्तियाजपाशा जमादार, बांगी मो. हनिफ , लिपिक जमीर शिकलगर, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका जैनबबी कुरेशी, शिक्षकेत्तर कर्मचारी जोहरबाशा शेख, महेबूब जमादार, विजय कांबळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनसीफा ढोबळे तर आभार बीबीमसीहा नूरसे या विद्यार्थिनीने मानले.
