लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयाचा अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी महोत्सव वर्षानिमित्त एकदिवसीय अभ्यास दौरा संपन्न
लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयाचा अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी महोत्सव वर्षानिमित्त एकदिवसीय अभ्यास दौरा संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालय,उदगीर येथील सर्व शिक्षक व शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी या त्यांच्या जन्म स्मृती स्थळास भेट देण्यासाठी गेले होते.
त्याठिकाणी सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याविषयी सखोल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. अहिल्यादेवीबद्दल आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे सर्व शिक्षकांनी सांगितले.मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी या अभ्यास दौऱ्यामुळे निश्चितच शिक्षकांच्या ज्ञानात भर पडेल व या ज्ञानाचा शाळेतील विद्यार्थ्यांनाही फायदा होणार असल्याचे सांगितले. भा.शि.प्र.संस्थेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
