भारतीय संविधान लोकशाहीचा आत्मा आहे – डॉ दत्ताहरी होनराव

0
भारतीय संविधान लोकशाहीचा आत्मा आहे - डॉ दत्ताहरी होनराव

भारतीय संविधान लोकशाहीचा आत्मा आहे - डॉ दत्ताहरी होनराव

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय संविधान हा भारतीय नागरिकांना मुलभूत हक्क आणि अधिकार देणारा ग्रंथ आहे. भारतीयांच्या जीवनात कोणत्याही धर्मग्रंथापेक्षाही संविधान हे अधिक महत्त्वाचे आहे.सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक अर्थिक स्वातंत्र्य भारतीयांना संविधानामुळे मिळाले आहे.राजेशाहीत राजा हा आईच्या पोटी जन्मतो तर राजकिय नेतृत्व जनतेतून निवडून येते.स्वत:चे हक्क आणि अधिकार जीवंत ठेवण्यासाठी संविधानाचे पावित्र्य जतन करणे आणि भारतीय नागरिकांमध्ये संविधानाविषयी जाणीव जागृती निर्माण करणे सर्वांचे कर्तव्य आहे.भारतीय संविधान हे लोकशाहीचा आत्मा आहे. असे विचार कै.रघुनाथ सुडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आवलकोंडा येथे प्रजासत्ताक अमृत महोत्सव कार्यक्रमात श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ दत्ताहरी होनराव हे बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंद भालेराव हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ सुशीलप्रकाश चिमोरे,विचारपीठावर मुख्याध्यापक गुरमे,प्रा.बिलापट्टे,प्रा.शिंदे, प्रा.चाळबा आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
डॉ सुशीलप्रकाश चिमोरे यांनी मराठी भाषा, संस्कृती आणि शाळेचे महत्त्व सांगितले.शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते वृध्दींगत व्हावे या साठी कुसुमाग्रजांची कविता गाऊन दाखवली. बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा ही दिल्या.
पुढे बोलताना डॉ होनराव म्हणाले की,जिथे मत विकून प्रतिनिधिला निवडून दिलेले असते, त्यांच्याकडून विकास, नैतिकतेची अपेक्षा करता नसते.
आपलं मत आपल्या देशाची लोकशाही टिकविणाऱ्या प्रतिनिधीला दिली पाहिजे.संविधानाने मतदानाचा अधिकार आणि हक्क दिले परंतु चांगले प्रतिनिधी निवडून देणे आपले कर्तव्य असते असे विचार
त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्राचार्य गोविंद भालेराव यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा.बिरादार यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!