उदयगिरी महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन संपन्न

0
उदयगिरी महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन संपन्न

उदयगिरी महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मराठी विज्ञान परिषद शाखा उदगीरचे अध्यक्ष डॉ. एस. एन. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनाच्या अध्यक्षस्थानी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही. पी. पवार हे होते. एकूण 63 विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदविला. सोलार पॅनल, मिनी कुलर, पर्यावरण, संगणक, आरोग्य, शेती व सायबर सिक्युरिटी, गाईचे शेण, दूध, दही, तूप, गोमूत्र याविषयीचे फायदे यासारख्या विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी पोस्टर व मॉडेल सादर केले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे परीक्षण शिवाजी महाविद्यालय, उदगीर येथील भौतिकशास्त्र विभागातील डॉ. व्ही. व्ही. जाधव व पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर येथील डॉ. मत्स्यगंधा पाटील यांनी केले. विज्ञान प्रदर्शनाचे समिती प्रमुख म्हणून डॉ. भालचंद्र करंडे यांनी भूमिका पार पाडली. प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, विद्यार्थी कल्याण मंडळ प्रभारी डॉ. सुरेश लांडगे यासह महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी विज्ञान प्रदर्शनाचा आनंद घेतला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!