शिवाजी महाविद्यालयात अशोकराव पाटील एकंबेकर यांची जयंती साजरी

0
शिवाजी महाविद्यालयात अशोकराव पाटील एकंबेकर यांची जयंती साजरी

शिवाजी महाविद्यालयात अशोकराव पाटील एकंबेकर यांची जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : शिवाजी महाविद्यालयात अशोकराव पाटील एकंबेकर यांची ७३ वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव पी.टी. शिंदे होते. तर विचार मंचावर प्र. प्राचार्य डॉ.आर.एम.मांजरे होते. अशोकराव पाटील एकंबेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी डॉ.मांजरे यांनी अशोकराव पाटील एकंबेकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना असे म्हटले की, बापूसाहेब पाटील या जमिनदाराच्या पोटी जन्माला आलेल्या अशोकराव पाटील यांनी ऐश्वर्या मध्ये न रमता पाचगणी व परभणी येथे जाऊन आपले शिक्षण पूर्ण केले.मराठवाडा कृषी विद्यापीठाचे ते पदवीधर होते. शिक्षण आणि शेती या क्षेत्रात त्यांनी काम केले.किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर या संस्थेमध्ये सदस्य, उपाध्यक्ष व अध्यक्ष या पदा‌वर ते अनेक वर्षे कार्यरत होते. त्यांनी ही पदे बहुजन समाजाच्या मुलाच्या शिक्षणासाठी व कल्याणासाठी भूषविले. शिक्षणावर त्यांचे मनापासून प्रेम होते.जन कल्याणाची तळमळ होती. हीच भूमिका त्यांनी आयुष्यभर कायम ठेवली.आज त्यांचा जयंती दिन महाविद्यालयात सन्मानाने साजरा करीत आहोत असे प्रतिपादन यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जयंती समिती प्रमुख प्रो.डॉ.सुरेश शिंदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. डी.बी.मुळे यांनी केले. या कार्यक्रमास प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!