विधवा महिला पूर्णांगीनी सोहळा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन

0
विधवा महिला पूर्णांगीनी सोहळा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन

विधवा महिला पूर्णांगीनी सोहळा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरात मकर संक्रातीचे औचित्य साधून उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधवा महिला पूर्णांगिनी सोहळा सन्मान ‘ति’ चा निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शोभा घोडके प्राचार्य रेखा तरडे यांची उपस्थिती होती. माजी नगरसेविका अनुराधा नळेगावकर यांच्या पुढाकारात्मक विधवा महिला पूर्णांगीनी सोहळा सन्मान ‘ति’ चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांच्या रक्त शर्करा, रक्तदाब, हिमोग्लोबिन तपासणी मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ. प्रमोद वट्टमवार यांनी केली. यावेळी उपस्थित महिलांना ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक बाळासाहेब नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश्वरी सोळंके यांनी आयुष्यमान भारत आरोग्य खाते क्रमांक काढून दिला. कार्यक्रमात बोलताना उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे म्हणाल्या की महिलांनी अशा प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक गावात राबवणे गरजेचे असून स्वंय सिद्धांचा सामाजिक स्तर उंचावण्याचा हेतू असतो. समाजामध्ये जीवन जगत असताना पुरोगामी विचार घेऊन जीवण जगणे योग्य आहे.संत बसवेश्वर महाराजांनी 12 व्या शतकात आणि व परंपरेचा विरोध केला होता.
कार्यक्रमाच्या आयोजिका माजी नगरसेविका अनुराधा नळेगावकर म्हणाल्या की मागील सहा वर्षापासून अशा कार्यक्रम घेतले जातात. स्वंय सिद्धांचे एकत्रिकरण, त्यांना अशा सामाजिक उपक्रमात सहभागी करून घेणे, कुटुंबाची जबाबदारी असल्याने महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात म्हणून त्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करणे हा या कार्यक्रमाचा हेतू असून अशातच शासन स्तरावरून उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, नामदार बाबासाहेब पाटील यांनीही अशा कार्यक्रम घेण्याच्या सूचना केल्या होत्या.
या कार्यक्रमास वर्षा माळी, शीला घाटोळ, पल्लवी मस्के, मीनाक्षी जाधव, सोनिका कदम, प्रणिता बेंबळे, ज्ञानेश्वरी भदाडे, आशा आवाळे, सुलोचना जायभाये, धनश्री कोटलवार यांची उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!